ग्रामपंचायतच्या प्रश्नावर सरपंच परिषदेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत १६ तारखेला बैठक

🔸सरपंच परिषदेचे कर्तव्यदक्ष राज्याध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांची माहिती

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.7सप्टेंबर):-राज्यातील ग्रामपंचायतीना येणाऱ्या अडचणी संदर्भात १६ सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे.तरी राज्यातील सरपंच,उपसरपंच सदस्य यांनी या आपल्याला काम करताना येणाऱ्या अडचणी या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडण्यात येणार आहेत.

यात प्रामुख्याने लाईट बिल,कॉम्प्युटर ऑपरेटर यांची कंपनी कडून होणारी अवहेलन,वित्त आयोगाच्या रक्कमेत होणारी कपात,घरकुल बांधकामात शहर,खेडे यात असणारी रक्कमेची तफावत,जयस्तुते कंपनी बंधन कारक करू नये,आय.सी.आय.बँकेत ग्रामपंचायतीचे खाते उघडणे ग्रामीण भागात बंधनकारक करू नये,पॅनल बंदी कायदा करावा,सरपंच यांना विशेष फंड असावा यासह अन्य मागण्या करणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी म्हंटले आहे.या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील,प्रदेश सरचिटणीस विकास जाधव,सर्व राज्य विश्वस्त,जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED