घळाटवाडी येथील नदीला महापूर येऊन शेकडो हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली

✒️अंगद दराडे(बीड प्रतिनिधी)

माजलगाव(दि.8सप्टेंबर):-तालुक्यातील घळाटवाडी येथील घळाटी नदीला दिनांक ७ सप्टेंबर रोजी महापूर येऊन येथील शेकडो हेक्टर पिकाचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. महापुरामुळे माजलगाव ते घळाटवाडी जनसंपर्क तुटला होता,पाण्याची पातळी बारा मीटर येवढी धोक्याच्या पातळीवर विक्रमी नोंदवली गेली. महापुराचे पाणी नदीचे पात्र सोडून लगतच्या चारशे मीटर क्षेत्रातुन वाहत होते, पुराच्या पाण्या मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, नदीलगतच्या सोयाबीन च्या शेतात पाणी गेल्यामुळे सोयाबीन चे पीक वाहून गेले आहे तर अनेक शेतामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिकाचे पूर्णतः हा नुकसान झाले आहे.

या आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे शेताकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून येथील शेतकरी अंगद दराडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.महापुरा मुळे येथील अनेक हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे एकूण आमची चार एकर जमीन पाण्याखाली गेली असून शेतामधील उभे सोयाबीन चे पीक वाहून गेले आहे, शेताला नदी पात्राचे स्वरूप आले आहे, केलेली सर्व मेहनत वाया गेली असून जगणं उध्वस्त झाले आहे,या पूरपरस्थितीत सरकारने शंभर टक्के पीक विमा मंजूर करून द्यावा अशी विनंती मी करत आहे,या पावसामुळे नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात यावा, मोबाईल नसल्याने ऑनलाईन नोंदणी झाली नाही,प्रत्येक्षात नुकसान ग्रस्त क्षेत्रात येऊन आमच्या पिकाचे पचनामे करून तात्काळ मदत करावी असे असे आव्हान करण्यात आले आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED