भारतीय विद्यार्थी मोर्चाची पश्चिम महाराष्ट्र विभाग स्तरीय बैठक सातारा येथे संपन्न…!

14

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8सप्टेंबर):-भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ, या सर्व सहयोगी संघटनांची संयुक्त पश्चिम महाराष्ट्र विभाग स्तरीय बैठक योगेश थोरात सर (प्रदेशाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली 5 सप्टेंबर रोजी सातारा येथे संपन्न झाली. बैठकी साठी प्रमुख उपस्थिती असलेले पदाधिकारी किरण कांबळे सर (राज्य महासचिव काॅलेज एवमं विश्वविद्यालय भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश),प्रथमेश ठोंबरे सर (राज्य प्रवक्ता भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) इ.राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीत चर्चेचे विषय.24 सप्टेंबर ला होणारे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे 9 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अंतर्गत तयारी आणि संघटनेच्या वाढ विस्तारा संदर्भात चर्चा करण्यात आली.आणि त्यावेळी सातारा शहर, कोरेगाव तहसील ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

त्यावेळी सातारा शहर अध्यक्ष पदी रोहित नितनवरे, सातारा तालुका अध्यक्ष पदी कुणाल देवकुळे यांची निवड करण्यात आली.कोरेगाव अध्यक्ष आदित्य कांबळे, उपाध्यक्ष सुजन गायकवाड पदी निवड झाली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना योगेश थोरात (प्रदेशाध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.आणि या पश्चिम महाराष्ट्र विभाग स्तरीय बैठकीचे संयोजक चेतन आवडे (जिल्हाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) प्रथमेश ठोंबरे (राज्य प्रवक्ता भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) इ.सदर बैठकीचे आयोजन केले होते.