अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा – सामाजिक कार्यकर्त्या शामल कळसे

28

✒️विशेष प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नांदेड(दि.8सप्टेंबर):-नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, नदी नाले तुडुंब भरून वाहिले, या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनीतील पिके जमीनदोस्त झाली, हातातोंडाशी आलेली शेतीपिकांचे व कच्च्या घरांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या – शामल भारत कळसे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे, नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, प्रत्येक पुलावरून पाणी वाहून गेलेल्याने अनेक गांवाचा संपर्क तुटलेला आहे.

वीज पुरवठाही मोठ्या प्रमाणावर खंडित झाला आहे, शेतीपिके चांगली आल्याने शेतकऱ्यांनी खते- औषधी मेहनतीवर मोठा खर्च केलेला होता, दिवस-रात्र काबाकष्ट करून तळहाताच्या फोडाप्रमाणे ‌ शेतातील पिके जोपासली होती, पिके चांगली दिसून आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र सध्या या झालेल्या ढगफुटीसदृश्य ‌पावसामुळे पिकांची व कच्च्या घरांची अतोनात नुकसान झाले असुन, याची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर शेती व कच्च्याघरांचे जागेवर जाऊन पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व कच्च्याघरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त बांधवांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी – अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्या- शामलताई कळसे यांनी प्रशासनाकडे केली आहे,