आमसरी/सुजातपुर येथे शासनाच्यानिधीचा अपहार

🔹बोरिंगच्यानावे हजारोंची लुट

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.8सप्टेंबर):-तालुक्यातील नँशनल हायवेला लागुनच असलेल्या सुजातपुर आमसरी ग्रामपंचायत मध्ये बोरिंग चे बोगस प्रकार च्यामाध्यमातुन अधिग्रहण दाखवुन शासनाचे हजारो रुपये म्हणजे जवळपास पंचविस हजार लाटल्याचा प्रकार ग्रामपंचायत सदस्यपती याने केल्याचे तक्रारीच्या माध्यमातुन ऊधड झाले आहे.सदस्यपती गोपाल पांडुरंग तायडे यांनी पत्नीच्या सदस्यपदाचा फायदा घेत संबधित ग्रामअधिकारी व ईतर अधिकारीवर्गाला हाताशी धरुन पाण्याची समस्या दाखवुन स्वताची खाजगी बोअरचे बोगस अधिग्रहण दाखवुन हा शासनाच्यानिधीवर डल्ला मारण्याचा प्रकार केल्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती व तहसिलदार खामगाव यांचे कडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमसरी येथिल घर क्रमांक136 मधील खाजगी बोअर त्यांच्या मालकिची खोटी दाखवुन व खोटे कागदपत्र अस्तित्वात आणुन शासनाकडुन बोअरअधिग्रहण केली व त्याबाबत शासनाकडुन मिळणारा मोबदला गैरकायदेशिररित्या लाटला व शासनाची फसवणुक केली वास्तविक पाहता गोपाल पांडुरग तायडे यांच्या पत्नी सौ आशाबाई गोपाल तायडे ह्या गटग्रामपंचायत सुजातपुरच्या सदस्य यापुर्विही होत्या व आजही आहेत त्यांच्यापतिने त्याचा सदस्यपदाचा फायदा घेत हा प्रकार त्यांनी करुन फौजदारी गुन्ह्यासाठी पात्र ठरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सोबत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अनियमीतता किंवा गैरव्यव्हारास सरपंच,ऊपसरपंच सदस्य किंवा ग्रामपंचायत कर्मचारी जवाबदार असल्याचे शासनाचे परिपत्रक ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक व्हिपीएम -2016/प्र क्र253/परा3/दि04.01.2017 चा संदर्भ जोडण्यात आला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED