शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशिल शिक्षक – मा.श्री.सतीश दळवी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.11सप्टेंबर):-जि.प.कन्या प्रशाला आष्टी,जि.बीड या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.सतीश त्रिंबकराव दळवी यांच्या शैक्षणिक कार्याविषयी घेतलेला आढावा.भारताचं भविष्य वर्गखोल्यातुन घडवताना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व,शैक्षणिक व मानसिक गुणवत्तेवर फोकस करणारे शैक्षणिक प्रवासी म्हणुन श्री.सतीश त्रिंबकराव दळवी यांचे नांव आघाडीवर आहे.मुलांचा वयोगट,मानसिकता,परिस्थिती, कौटुंबिक व वैयक्तिक समस्या समोर ठेवुन केलेले अध्यापन प्रभावी ठरते,यावर नितांत श्रध्दा असणारे श्री.सतीश दळवी यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेकानेक नेत्रदिपक प्रयोग राबवले आहेत.समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी होतकरु आहे.

ही उदात्त भावना मनात ठेवुन तळमळीने प्रयत्न करणारे श्री.सतीश दळवी यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही,किंबहुना हतबल झाले नाहीत.या सकारात्मक भावनेने प्रतिकुल व विषम परिस्थितीवर मात करताना ज्या जि.प.शाळेत सेवा दिली तिथे दर्जेदार शिक्षण व विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे.जि.प.कन्या प्रशाला आष्टी,जि.बीड येथे सेवा देताना सहकारी शिक्षकांना प्रेरीत करुन आणि लोकसहभागातुन त्यांनी उभा केलेले प्रकल्प व भौतिक सुविधा संस्मरणीय आहेत.विद्यार्थी गरजा,पालकांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामधुन शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा विकसित करताना श्री.सतीश दळवी यांनी शाळेला मंदिराचा दर्जा मिळुन देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.लहान मुलं कच्या मातीचे गोळे आहेत,तद्वतच ती वंचितांची लेकरं आहेत,म्हणुन त्यांना समन्यायी वर्गाध्यापन करताना श्री.सतीश दळवी हे त्यांच्या सुखा-दु:खात,समस्या व प्रश्नांत मनस्वी सहभागी झालेले आहेत.

सहशालेय उपक्रम राबवताना सर्वानंद देणाऱ्या श्री.सतीश दळवी यांच्या स्तुत्य व विधायक कार्याचे गावचे पालक,विद्यार्थी आजही आवर्जुन कौतुक करतात.विद्यार्थी गुणवत्ता विकासाला समर्पित श्री.सतीश दळवी यांनी वेळ,काळ,आहार व आरोग्याची तमा न बाळगता केलेले दिमाखदार शैक्षणिक कार्य नि:संशय अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहेच.समृध्द सांस्कृतिक वारसा असणाऱ्या पुंडी भुमिपुत्राचा शैक्षणिक सेवेचा प्रवास अखंड व अव्याहत चालु आहेच.शाळांशाळांतील गरजवंत,वंचित,होतकरु व उपेक्षित बालकांची सेवा करणाऱ्या कर्तव्यपरायण,प्रतिभावंत,कर्तव्यदक्ष, बहुमुखी व कर्मयोगी श्री.सतीश दळवी यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शाळेतील सर्व शिक्षक,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य व आष्टीकर तसेच शिक्षणप्रेमींकडुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED