जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये ब्रह्मपुरी पंचायत समिती नंबर वन

🔹सभापती रामलाल दोनाडकर यांचे कुशल नेतृत्व

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12 सप्टेंबर):-जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने जिल्हा परिषद जी ए डी(आस्थापना) विभागामार्फत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समितीचे गुण मूल्यांकन केले जात असते या गुण मूल्यांकनात जिल्हा परिषद चंद्रपूर मधून ब्रह्मपुरी पंचायत समिती माहे ऑगस्ट 2021पर्यंत 44.86टक्केवारी घेऊन नंबर वन बनलेली आहे.

ब्रह्मपुरी पंचायत समिती जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या तुलनेत सर्व विभागांच्या रॅकिंगमध्ये अव्वल ठरलेली आहे. यामध्ये पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, घरकुल विभाग, मनरेगा विभाग, शिक्षण विभाग ,पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग ,आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग ,स्वच्छ भारत अभियान, कार्यालयीन आस्थापना, बांधकाम विभाग, लेखा विभाग .इत्यादी सर्व विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून जिल्हा परिषद मध्ये आपले अव्वल स्थान निर्माण केलेले आहे विशेष म्हणजे ब्रह्मपुरी पंचायत समितीचे अव्वल स्थान सन जानेवारी 2020 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत अबाधित ठेवले आहे कायम ठेवले आहे.

पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाडकर आणि प्रभारी संवर्ग विकास अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरिष रामटेके यांनी आनंद व्यक्त करून सर्व कर्मचारी वृंदांचे आणि पंचायत समिती सदस्यांचे आभार मानले आहे .कारण कर्मचारी पदाधिकारी यांचे सूरेख सहकार्यातूनच पंचायत समिती ब्रह्मपुरीचा सन्मान वाढविणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED