शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी जमातींना खावटी वाटप चा कार्यक्रम आज संपन्न झाला

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिंदखेडा(दि.13सप्टेंबर):-तालुक्यातील खावटी वाटप करण्यात आले. आदिवासी कोळी ढोर, व टोकरे कोळी, भिल्ल, ठाकूर, अश्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 47 अनुसूचित जमातींना आज दिनांक 13 /9 /2021 रोजी आदिवासी खावटी योजनेअंतर्गत वाटप करण्यात आली.

या वेळेस आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य चे आंदोलन प्रमुख व वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय आप्पासाहेब नामदेव येळवे माननीय मोतीलाल सोनवणे सर श्री शहाणाभाऊ भिल्ल श्री अण्णासाहेब रोहिदास माळचे श्री लक्ष्मण पांडुरंग येळवे श्री पितांबर येळवे, गुलाब ठाकुर अन्य मान्यवर व्यक्ती या खावटी वाटप योजनेसाठी उपस्थित होते वालखेडा गावातील 135 लोकांना खावटी वाटप करण्यात आली.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED