निफाड येथे कादवा नदी च्या पुलावरुन आयशर ट्रक थेट नदीत कोसळला

✒️विजय केदारे(नाशिक प्रतिनिधी)

निफाड(दि.13सप्टेंबर):- येथे आज सोमवारी पहाटेच्या सुमारास कादवा नदी पुलावरून वाहन पडल्याने मोठा अपघात घडला यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पहाटेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणारा एम एच सतरा जी वाय 25 53 क्रमांकाचा आयशर निफाड येथील नदी वरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदीवरून आयशर खाली कोसळला.

यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आयशर वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व क्रेन च्या साह्याने व आयशर टेम्पो बाहेर काढण्यात आला

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED