तर मग नुकसान भरपाई ही बहात्तर तासाच्या आत द्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यावर 72 तासाच्या आत तक्रार नोंदवावी, तर मग नुकसान भरापाई ही बारा तासाच्या आत मिळाली पाहिजे, असा ही नियम लागू करायला हवा ना,प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना का वेड्यातुन काढल्या जातं हा इथे सवाल निर्माण होताना दिसतोय

निसर्ग आमच्यावर कोपला सर्व मेहनत वाया गेली क्षणात नंदीच पाणी महापुरा सारखं माझ्या शेतात येऊन साडे तिनं फूट उंची असणारी माझी सोयाबीन दिसेनाशी झाली, अगदी जवळ आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने विदयुत पुरवठा 82 तास बंद झाला अन वरून तुम्ही नियम लावताय कि 72 तासात नोंद करा तक्रार करा,ठीक आहे तुमचं म्हणणं मान्य करू, मग तुम्ही ही 72 नव्हे तर अजून 72 घ्या 144 तासात आम्हाला मदत करा आमच्या खात्यात शंभर टक्के निधी द्या तेव्हाच तुम्हाला तो अधिकार समजा अन्यथा आम्हाला असे येड्यातून काढण्याचे चाळे अन सोग ढोग करू नका

अरे काय समजतायेत तुंम्ही आम्हा शेतकऱ्याला नेहमीच तुमचं काही ना काही अटी तटी बस झालं ना,आता बंद करा हे तुमचं,आता ऐकावंच लागलं आमचं. गेली तिन वर्ष झाली विमा येत नाहीये,काही काही ज्वलंत उदाहरणं आहेत जे सांगून विश्वास ही नाही होत, तुमच्या या कार्य पद्दत्तीपणाचा. अरे बाधासमोर बाध असतांना एक शेतकरी नोंदणी करतो व एक माझा भोळा गरीब शेतकरी मोबाईल नसल्याने नोंदणी करायचा राहून जातोय मात्र नुकसान दोघंच सारखंच विमा ही भरलेला सारखाच मात्र तुंम्ही त्याला पैसे देतात अन त्या गरिबाला नोंदणी वाचून वगळतायेत,एवढा अन्याय गरीब अन असुशिक्षित शेतकरी वर्गावार करतात, किती सहन करायच अजून आम्ही, कोणा कोणाला आमचे लचके तोडून रघत पियू द्यायचं

पाऊस का गुंट्या गुट्यावर वर पडतोकी काय अगदी तसंच केलं आहे तुंम्ही,बांधाला बाध असतांना एकला देतायेत एकाला नाही, नुकसान होऊन बहात्तर तासात आमच्या बापाला नोंद करता आली नाही तर नाही,पण तुमच्या कुणाला त्याहून दुप्पट वेळ घेऊन मदत करता येत असेल तरच आमच्या वर निर्भध व नियम लाधा अथवा बंद करा हे चाळे, इथे पाऊस गेल्यावर लाईटच 82 तास नसते तर 72 तासात कश्याने नोंदणी करायची आम्ही, नियम का फक्त आमच्या साठी आहेत का, की आम्हा ला वेड्यातून काढतायेत,एकतर हे ऑनलाईन बंद करा,सरसकट विमा मंजूर करून वाटप करा आम्हाला 72 तासात नकोय,महिन्याभरात जरी तुम्ही मदत केली तरी चालेल, कारण आम्ही शेतकरी आहोत आमच्या रक्तात कोणाला वेडं बनवन नाही, जसं की याचं वेळेतच करा नाही तर नाही, माई बापानो हात जोडून कळकळीची विनंती असेल आम्हा शेतकरी वर्गाला छळू नका, आमच्यकडे मोबाईल नाहीयेत, आम्हाला ते चालवता येत नाहीयेत, लाईट वेळेवर नसते,तुमचा तो टोल फ्री नंबर लागत नाहीये,असे अनेक कारणे आहेत जे अनेक अडथळा निर्माण करतायेत.त्यामुळे ते तुमचे नियम आधी रद्द करा आणि एक पंधरवाडा म्हणजेच किमान 16 दिवस तरी नोंदणी नियम ठेवा व मदत सरसकट करा बस एवढंच करा.

✒️लेखक:-अंगद दराडे(बीड)मो:-8668682620

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED