खामगाव येथे स्वराज्य ध्वज यात्रेचे जंगी स्वागत

29

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.13सप्टेंबर):-मा_आ_श्री_रोहितदादा_पवार यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच 74मीटर स्वराज्य भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे त्यानिमित्ताने शेगाव येथे #श्री_संत_गजानन_महाराज यांच्या तीर्थक्षेत्री ध्वज पूजनासाठी स्वराज्य ध्वज यात्रा खामगाव येथून शेगाव येथे मार्गक्रमण करत असता हॉटेल_देवेंद्र या ठिकाणी मोठ्या उत्साहात ढोल ताशे,सनई चौघडा च्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खामगाव शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख यांनी स्वराज्य ध्वजाचे पूजन करून स्वागत केले. स्वराज्य ध्वजाची विशेषता अशी की स्वराज्य ध्वज हा भगव्या रंगाचा असून समानतेचा सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा आहे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचे प्रतीक असून प्रगतीचे, त्यागाचे, संघर्षाचे, न्यायाचे, प्रगल्भतेचे, आणि समतेचे, प्रतीक तसेच स्वराज्य ध्वज हा सर्वांचा असून देशाचे भवितव्य असलेल्या युवाशक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल व आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळासोबत पुढे जाताना आपल्या समृद्ध परंपरा वारसा जपण्याचा वाढविण्याच्या हा एक प्रयत्न आहे.

या उद्देशाने हा स्वराज्य ध्वज उभा करण्यात येणार या हेतूने ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी या ध्वजाचे पूजन होणार आहे ३७ दिवसाच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज सहा राज्यांमधून १२ हजार किलोमीटर प्रवास करून ७४ ठिकाणी स्वराज्याचे प्रतिनिधिक पूजन होईल.यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, विश्वनाथजी झाडोकार, गोतमारे सर, कडू सर, प्रदेश युवक सचिव ऍड वीरेंद्र झाडोकार, सोशल मीडिया अध्यक्ष दिलीप पाटील, नरेंद्र पुरोहित, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष #आकाश_खरपाडे, तालुका युवक अध्यक्ष भगवान लाहुडकार, प्रशांत धोटे, मिर्झा अक्रम बेग विजय कुकरेजा, अमोल बिचारे, राजेंद्र वराडे, अविनाश वानखेडे, अजय धनोकार, रवी आंधळे, निखिल अतकरे, नरेश भारसाकडे, रणजीत पाटील, अशोक कंकाळे, विजय चोपडे, सुरज थोरात, ओम शेटे, आनंद तायडे, जयराम माळशिकारे, अरविंद चव्हाण, दीपक शिंदे, व स्वराज्य प्रेमीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
असे खामगाव विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष दिलीप पाटील यांनी कळविले आहे.