आष्टी येथे आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13सप्टेंबर):-आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात.अशाच एक आगळावेगळा उपक्रम यावर्षी गणेश उत्सवानिमित्त आष्टी व मुर्शदपुर शहरात गौरी – गणपतीच्या सजावट २०२१ स्पर्धेचे आयोजन आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.ही स्पर्धा आष्टी व मुर्शदपुर या शहरासाठीच मर्यादित असेल,सजावटीचा एक उत्कृष्ट फोटो ८ बाय १० साईजमध्ये बंद पाकिटात आपले नाव,पत्ता व मोबाईल नंबर सह द्यावेत.स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना रोख पारितोषिक आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचा निकाल आपल्याला आपण दिलेल्या क्रमांकाच्या फोनवर कळवला जाईल.बक्षिस वितरणाची वेळ आणि तारीख फोनवर कळविण्यात येईल.यात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिला वर्गांचे नंबर सुरक्षित राहतील.तुम्ही काढलेला फोटो ९८६०२७३३०० / ८८३०३९६३०० या क्रमांकावर संपर्क साधून बुधवार दि.१५ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाठवावे असे आवाहन आ.सुरेश धस मिञ मंडळ आष्टी यांनी केले आहे.या स्पर्धेसाठी नियम व अटी असणार आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED