चामोर्शी :- ग्रामपंचायत मारकंडा (कं) अंतर्गत वार्ड क्रमांक एक मधिल स्ट्रीट लाईन एक महिन्या पासून बंद

28

🔸आलापली मसाहत येथील ग्रामस्थ म्हणतात स्थानिक ग्रामपंचायत सदस्याचे दूर्लक्ष

🔹ग्रामपंचायत सदस्य म्हणतो महावितरण चे दूर्लक्ष

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.13सप्टेंबर):- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मारकंडा (कं) येथील वार्ड क्रमांक एक आलापली मसाहत येथील स्ट्रीट लाईन एक महिन्या पासून बंद आहे आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही क्षणी सरपटणारे प्राणी निघू शकतात हे नाकारता येत नाही व आष्टी परीसरात बिबट्या वाघाची दहशत असून हा बिबट्या वाघ मानवी वस्तीत येऊन हल्ले करीत आहे या करीता रात्रोच्या वेळी घराबाहेर पडताना जिव धोक्यात घालून बाहेर पडावे लागते. करीता स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना माहिती असूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी माहिती पत्रकार भास्कर फरकडे यांना आलापली मसाहत येथील श्री पांडूरंग शेंडे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांनी माहिती दिली येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर स्ट्रीट लाईन सूरू करण्यात यावी अशी मागणी आलापली मसाहत येथील ग्रामस्थ करीत आहे

—–बॉक्स—-

आलापली मसाहत येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्याना विचारणा केली असता महावितरण विभागाला माहिती दिली आहे. परंतू लाईन सूरू होत नाही याचे नेमके कारण सांगितले जात नाही आहे व एकदा वायर ची आवश्यकता आहे असे सांगितले असता वायर घेऊन देण्यात आले व लाईन दुरूस्ती करण्यात आली व दोन दिवस सूरळीत लाईन सूरू होती दोन दिवसानंतर पुन्हा लाईन बंद झाली तेव्हा पासून आलापली मसाहत येथील लाईन आज एक महिना होत आहे बंद आहे या बाबतीत महावितरण विभागाला विचारणा केली असता आम्हाला वेळ नाही उद्या करू परवा करू असे सांगितले जात आहे. याकडे आम्ही आमचे प्रयत्न करीत आहोत पण महावितरण विभाग दुर्लक्ष करीत आहे असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले