जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीच्या ऑनलाइन मध्ये एम एस बी टी इ हा पर्यायच उपलब्ध नाही

33

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.13सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदे मध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये पाच पदाकरिता भरती प्रकिया पार पडणार आहे या पदामध्ये औषध निर्माता च्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करतांना उमेदवारांना अडचणी येत असून त्याचे डी फार्मसी झाले यांनी अर्ज भरतांना पूर्ण प्रकिया झाल्यावर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन हा पर्याय त्या ठिकाणी येत नसल्याने उमेदवारांना अडचणी निर्माण होत असून याबाबत हेल्पलाईन नंबर वर ही पूर्ण माहिती भेटत नाही.

याबाबत सविस्तर असे की जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून या साठी संपूर्ण महाराष्ट्रात जागा भरण्यासाठी 21 सप्टेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे.यामध्ये पाच पदाकरिता भरती प्रक्रिया पार पडणार असून पद क्र.1-औषध निर्माता, पद क्र 2 -आरोग्य सेवक, पद क्र 3- आरोग्य सेविका,पद क्र 4 – आरोग्य पर्यवेक्षक,पद क्र 5 – प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा पाच पदासाठी भरती होणार असून या पदा पैकी औषध निर्माता पदासाठी ऑनलाइन अर्ज करतांना ज्या विद्यार्थ्यांनी एम एस बी टी इ ( महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन) अंतर्गत डी फार्मसी केली आहे.

व प्रमाणपत्र मिळाले आहे अशा उमेदवारांना या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या वेळी सदर पर्याय उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत,याबाबत जाहिरात दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क केला असता तपासून सांगत आहोत असे सांगून फोन सुरूच ठेवतात व नंतर कट होतो ,अनेक वेळा फोन लागत नाही त्यामुळे याबाबत संबंधित कार्यालयाने व अधिकारी यांनी यामध्ये दुरुस्ती करून सदर पर्याय उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी एम एस बी टी ई अंतर्गत लायसन्स प्राप्त उमेदवारांनी व्यक्त केली आहे.