भारतीय विद्यार्थी मोर्चाचे 9 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार…!!

✒️सचिन सारतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13सप्टेंबर):-भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैरराजनितिक संघटन असुन शोषित, पिडित, गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असतांना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून करीत आहे. अशाच प्रकारे भारतीय विद्यार्थी मोर्चा (BVM), भारतीय युवा मोर्चा (BYM), भारतीय बेरोजगार मोर्चा (BBM), भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ (BVCP), राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ (RACS),या सर्व सहयोगी संघटनांचे संयुक्त 9 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन 24 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक .नितेश‌ कराळे सर (बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक,आणि संचालक, फिनिक्स अकॅडमी, वर्धा), प्रमुख उपस्थिती इंजि.संजय सोनवणे (असिस्टंट कमिशनर, मुंबई-BMC)उमेश कोर्राम (स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया).या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमकुमार गेडाम सर (राष्ट्रीय प्रभारी, BVM BYM BBM BVCP RACS IRSA नई दिल्ली) हे करणार आहेत.भारतातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या राजकीय गतीविधींसाठी गर्दीच्या स्वरूपामध्ये बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, विद्यार्थिनी व बेरोजगार यांचा वापर करणे आणि त्यांना संख्येच्या प्रमाणात राजकीय भागीदारी व नेतृत्व न देणे हा ब्राह्मणी षड्यंत्राचा एक भाग होय :- एक गंभीर चिंतन.सरकारी पदभरतीची जाहिरात काढून, प्रत्यक्षात पदभरती न करता तरुणांना बेरोजगार करून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, एक ब्राह्मणी षड्यंत्र होय :- एक गंभीर चर्चा राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केल्याशिवाय कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही.

हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात दि. 24 सप्टेंबर रोजी, सकाळी 11 वा.पासुन सायं.4 वाजे पर्यंत @PremkumarGedam, या फेसबुक पेज वर होणार आहे.तरी या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, युवा, विद्यार्थीनी आणि बेरोजगारांनी मोठ्या संख्येने लाईव्ह स्वरूपात पहावे असे चेतन‌ आवडेव(जिल्हा अध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) यांनी सांगितले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED