गणेश उत्सव निमित्त नवजीवन संगोपन केंद्र आष्टी च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

30

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13सप्टेंबर):-तालुक्यात नवजीवन संगोपन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य,शेती विषयक उपक्रमाबरोबरच भटके विमुक्त,आदिवासी,ऊस तोड मजूर,वीट भट्टी कामगार,वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन संगोपन केंद्र आष्टी च्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत आहे.

यामध्ये गणपतीची विविध रूपे हा विषय आहे.ही स्पर्धा आष्टी तालुक्यातील इयत्ता ५ वी ते १० तील मुला मुलींसाठी आहे.आपले चित्र दिनांक १९ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथे येऊन जमा करावे.त्यानंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.तरी आष्टी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नवजीवन संगोपन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.