अवैध धंद्यांवर पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत विशेष मोहीम व छापेमारीची कारवाई सुरू

27

🔺दारूविक्रेत्यांवर ८६ केसेस -एकूण ५,८८,६४० रू चा मुद्देमाल जप्त

🔺एकूण ०६ जुगार केसेस – ३,०३,५१५रू चा मुद्देमाल जप्त

🔺विशेष पथक तसेच इतर अधिकारी यांचे कडून १,५३,०००रू कीमतीचा मुद्देमाल हस्तगत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. १४ सप्टेंबर):-पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत अवैध धंद्यांवर आळा घालणे, गुन्हेगारांच्या अवैध कारवायांवर नियंत्रण आणने तसेच उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता व त्या अनुषंगाने मा. वरीष्ठांच्या आदेशाने विशेष मोहीम राबण्यात येत असून आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बाधीत राहावी तसेच अवैध धंदे करणारे व
सराईत गुन्हेगार यांचेवर प्रतिबंध असावा याकरीता वेळोवळी अवैध धंद्यांवर छापेमारीची कारवाई सुरू असून प्रतिबंधात्मक कारवाई करणे सुरू आहे.

माहे जुलै २०२१ पासून अवैध दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण ८६ केसेस करण्यात आल्या असून त्यातून एकूण ५,८८,६४० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. माहे. जुलै २०२१ पासून एकूण ०६ जुगार केसेस करण्यात आल्या असून त्यातून ३,०३,५१५रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

अवैध दारू विक्री करणारे यांचेवर कलम ९३ मुंबई दारूबंदी कायद्यान्वये एकूण ७८ प्रस्ताव पाठवण्यात आले असून १६ सराईत गुन्हेगारांवर कलम ११० सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.पो.स्टे स्तरावर गठीत असलेले विशेष पथक तसेच इतर अधिकारी यांचेकडून एकूण ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यातून १,५३,०००रू कीमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

आगामी गौरी गणपती देवी तसेच ईतर सण उत्सव लक्षात घेता कोणताही अपघात होवू नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. तसेच सदर सण उत्सवादरम्यान अवैध धंद्यांवर विशेष मोहीम अधिक प्रभावीरित्या राबवून छापेमारीची कारवाई सुरू राहणार असून गुन्हेगारीप्रवृत्ती असेल्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असे ब्रम्हपुरी पुलीस स्टेशन कडून जनतेला कळविण्यात येत आहे.