गडचिरोली :- शेतकऱ्याच्या चुकीने आजी व नातवाचा मृत्यू

33

🔺मच्छी खड्ड्याला लावला विद्युत प्रवाह

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.15सप्टेंबर):- तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राममोहनपुर येथे दिनांक 14. 9. 21 . रोजी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तिघाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली असून रामकृष्ण विश्वास आपल्या शेतातील मच्छी खड्डा असलेल्या ठिकाणी तार पसरून त्याला विद्युत करंट लावले होते परंतु ते त्याच्या मुलाला माहित नसल्याने राजू रामकृष्ण बिश्वास वय 18 राममोहनपुर व वीर कुमार सुभाष मंडळ वय 14 वर हे दोघे सकाळी अकरा वाजता शेतात गेले.

असता विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच गतप्राण झाले सायंकाळी हे दोघे घरी परत न आल्याने शेतावर शोध घेण्याकरिता शेतात गेले असता दोघेही गतप्राण झाल्याचे दिसल्याने कमल आपल्या नातवाला पाहून त्याच्या अंगावर जाऊन पडली जिवंत विद्युत प्रवाह सुरू असल्याने तीही जागीच गतप्राण झाली या घटनेची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे शवविच्छेदनाचा करिता आणण्यात आले असून पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांचे मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक जंगले व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत