चामोर्शी – बिपट्याच्या दहशतीत असलेल्या कुटुंबाना वन कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक

33

🔹बिपट्या खानार तरी काय अशी वन कर्मचाऱ्यांची भाषा

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.15सप्टेंबर):- तालुक्यातील आष्टी पेपर मिल वसाहती मध्ये दिनांक 13.9.2021रविवार रोजी सायंकाळी सात वाजताचे दरम्यान चपराळा अभयारण्यतील बिबट्याने अंश मोरे या मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. अंश व प्रवेशशिंग हे गणेश आरती करिता जात असताना अचानक बिबट्याने मुलावर हल्ला केला तेव्हा परवेश सिंग सिक्युरिटी गार्ड यांनी काठीने मारून बिबट्या ला हाकलुन लावले मात्र यात मुलांच्या हाताला व कमरेला गम्भीर दुखापत झाली असून मुलाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याला चंद्रपूर ला हलविण्यात आले .आता सघा तो आष्टी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.

पेपर मिल वसाहतीत राहत असलेल्या कुटुंबाना वन कर्मचाऱ्यांनी जंगलात खायला काही मिळत नाही तर बिपट्या काय खानार असे त्यांना बोलून मणुष्याची तुलना जनावराबरोबर करीत आहेत.आमदार डॉ. देवराव होळी याच्या भेटी दरम्यान पेपर मिल येथील महिलांनी सांगीतले यावर आमदार डॉ. देवराव होळी यांनी आष्टी परीसरात वन्य जीव अभयारण्य व वन विकास विभाग. व प्रादेशिक वन विभाग असे तिन विभाग असल्याने कोणत्या विभागातील वन कर्मचारीअशा प्रकारची भाषा वापरत आहेत त्यांच्यावर याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

वनविभागाने सदर बिपट्यास ईकडे आणून सोडले तेव्हा त्यांच्या भोजनाची व्यवस्था वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे परंतु ते कानाडोळा करीत आहेत व तो परीसरातील कोंबड्या बकरे गायवासरू यावर ताव मारत होता मात्र आता तो मानवाकडे वळला असल्याने त्याचा बंदोबस्त करने गरजेचं ठरत आहे.बिपट्या जगण्यासाठी काय खाणार अशी भाषा बोलणाखरच त्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार , शिवसेना कार्यकर्ते राकेश बेलसरे राजू एडलावार अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे , पेपर मील मजदूर सभा महासचिव बि.सी. बॅनर्जी , वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत ,वनपाल ठाकरे उपस्थित होते.।