महाबँक कर्मचाऱ्यांचे नोकर भर्तीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

50

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.15सप्टेम्बर):- रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र , अंचल कार्यालया समोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत बॅंकेत नोकरभरतीसाठी महाबॅंक कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले व सायंकाळी 5 वाजता अंचल प्रबंधक यांना तात्काळ नोकर भर्ती करावी या साठी निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाची माहिती देतांनाचे बैंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशन चे विदर्भ अध्यक्ष कॉ. शाम माईणकर म्हणाले की बॅंकेतील 1145 शाखांतून सफाई कर्मचारी नेमले नाहीत, 645 शाखांमध्ये शिपाई नाहीत, 360 शाखांमध्ये सफाई कर्मचारी नाहीत, सफाई कर्मचारी व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. याचा बॅंकेच्या ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. याशिवाय मृत्यु, सेवानिवृत्ती, पदोन्नती, स्वेच्छा निवृत्ती यामुळे रिक्त झालेल्या लिपीकांच्या जागा भरलेल्या नाहीत. सरकारकडून जन-धन व इतर योजना राबविल्या जातात. पेन्शन, आधार, अनुदान वाटप ही सगळी कामे बॅंकेतूनच सुरु आहेत. त्यामुळे कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत आहे व ग्राहक सेवा सुद्धा प्रभावित होत आहे. व्यवस्थापनाने संघटनेशी केलेले करार धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांशी निगडीत सर्व प्रश्नांवर व्यवस्थापन एकतर्फी निर्णय घेत आहे.

पहिल्या टप्प्यात 1872 शाखांतील कर्मचाऱ्यांनी दि 07 सप्टेम्बर पासुन “मागणी दिवस” बॅच लावून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान बॅंकेच्या चेअरमनला ई मेलद्वारे आवाहन पत्र पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने आज 15 सप्टेंबर रोजी झोनल ऑफीसपुढे धरणे आंदोलन केले गेले. यापुढे 22 सप्टेंबर रोजी बॅंकेचे मुख्यालय पुणे येते महाधरणे आयोजित करण्यात येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी महाबॅंकेतील कर्मचारी एकदिवसीय, तर 21 आणि 22 ऑक्टोम्बर रोजी असे दोन दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत.

या आंदोलनामध्ये कॉ. शाम माईणकर, कॉ. प्रविण महाजन, कॉ. अतुल वर्मा, कॉ. श्याम वानखडे, कॉ. जितेंद्र येळमे, कॉ. अविनाश आखरे, कॉ. सतीश धुमाळे, कॉ. राजेन्द्र तोमर, कॉ. किशोर आलेकर , कॉ. दिपक पुंडकर, कॉ. प्रशांत शेळके, कॉ. विशाल गायकवाड, कॉ. अनिल मावळे, कॉ. अनिल बेलोकर, कॉ. सुदर्शन सोनोने, कॉ. शुभांगी मानकर, कॉ. शिल्पा ढोले, कॉ. फैजल हुसैन, कॉ. राजेंद्र मिश्रा, कॉ. सचिन जयपिल्ले, कॉ. कॉ. सतेज ढोक , कॉ. प्रदीप देशपांडे, कॉ. देवलाल शिरसाट, कॉ. संतोष गायकवाड, कॉ. विजय वाहाणे, कॉम प्रफुल्ल नारखेड़े, कॉम प्रमोद शिरसाट, कॉम संतोष पाटील, कॉ. शुभम लांडे आदी संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत.