झोतवाडे परीसरामध्ये अतिवृष्टी पाऊस

32

🔺कापुस पीकांचे मोठ्यप्रमाणात नुकसान

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.16सप्टेंबर):-शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गाव परीसरात मुसळधार पावसामुळे कापसाचे बोंड सळव काळे पडल्याने कापूस पीकांचे मोठ्यप्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शेतकरी वर्ग हा चिंतित झाला असून शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची मागणी केली आहे. झोतवाडे परीसरात अतिवृष्टी झाल्याने बाजरी,मका,कांदा,कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचानामे करून भरपाई मिळवुन द्यावी, अशी मागणी होत आहे.

झोतवाडेसह शेंदवाडे, साहुर, कोडदे, तावखेडा, निमगुळ, दाऊळ, मंदाने या परिसरात मे महिन्याची कापुस पीकांचे लागवड करण्यात येते तसेच गेल्या आठवड्यापासून पावसाने संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासाच झोतवाडे मंडळात ८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे अतिवृष्टी झाल्याने कांदा,भाजीपाला,कापूस आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच कापसाचे पिक अतिपावसामुळे लाल पडू लागले आहे. कांदाही, बाजरी या पीकांचे नुकसान झाले आहे.

बऱ्याच ठिकाणी नागरीकांनी पावसाच्या भितीने रात्र जागुन काढली पावसाचा खरीप हंगामाला फारसा उपयोग होणार नसला तरी रब्बी हंगामासाठी त्याचा मोठा फायदा होईल, असे जानकार शेतकरी वार्गा कडून सगण्यात येत आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचानामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केले आहे.झोतवाडे मुसळदार पावसाने हजेरी लावली. त्यात दोन दिवसात संततधार सुरु असलेल्या पावसाने रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडता आले नाही. अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिके पिवळे पडू लागली आहेत. तसेच मंचनामे करून भरपाई द्यावी असे शेतकरी वर्गांची मागणी आहे.