आमदार दिलीपराव बनकर यांची आढावा बैठकीत सूचना नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावा कामचुकारावर कारवाई करा

37

✒️प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.16सप्टेंबर):-काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे गावपातळीवरील अनेक विकासकामे रखडून पडतात अश्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचला तसेच शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी नम्रतेने बोलून त्यांची कामे तात्काळ मार्गी लावा अश्या सूचना निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी निफाड येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकी प्रसंगी केल्या.

याप्रसंगी आमदार बनकर यांनी निफाड तालुक्यातील कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा आढावा आरोग्य विभागाकडून जाणून घेतला यात निफाड तालुक्यात आजपर्यंत १९०९६ रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी १८३०८ रुग्ण बरे झाले आहेत तर आज पर्यंत ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज रोजी गृह विलगिकरणातील ७५ रुग्ण मिळून एकूण १०१ रुग्ण कोरोणा बाधित आहेत तर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना आमदार बनकर यांनी दिल्या व लसीकरणात तालुक्याचा अव्वल क्रमांक असले बाबत कौतुक करतांना आरोग्य विभागाला लसीकरण करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ तोडगा काढून लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात राबवण्यात यावे अशा सूचना दिल्या.

निफाड तालुक्यातील ओझर व सुकेणे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा अश्या सूचना आमदार बनकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या तसेच तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुसज्ज वसाहती साठीचे प्रस्ताव सादर केले असून लवकरात लवकर वासहतीसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे अशीही माहिती आमदार बनकर यांनी दिली, महसूल विभागाने सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ विनाविलंब द्यावा, आदिवासी खावटी योजनेत रेशनकार्डची येणारी अडचण तात्काळ सुधारावी, तसेच खाते क्रमांक चुकलेल्या लाभार्थ्यांचे खाते क्रमांक माहिती घेऊन त्यांना रोख व किटच्या स्वरूपात लाभ द्यावा अश्या सूचना देण्यात आल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी व कोरोनाचे कारण न देता रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत. पंचायत समिती, वन विभाग, निफाड नगरपंचायत, कृषी विभाग, महिला बाल विकास, भूमी अभिलेख, सहकार विभाग, दुय्यम निबंधक या विभागांचा आढावा घेऊन त्यांना कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेत, तालुक्यात अपूर्ण किंवा सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या !

याप्रसंगी निफाड पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजना अंतर्गत चागली कामगिरी बजावली अश्या ग्रामपंचायतीना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे ,तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कोशिरे, तालुका कृषी अधिकारी भटु पाटील, बांधकाम विभागाचे अर्जुन गोसावी, आदीवासी विभागाचे सूर्यभान सुडके, तालुका भूमिअभिलेखचे संधान, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे अशोक रहाटे, पिंपळगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, सायखेडा पोलीस उपनिरीक्षक पप्पू काद्री, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी ,तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते !