वर्धा येथील पेट्रोलपंप रद्द करण्यात यावा-आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

31

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि .१७सप्टेंबर):-वर्धा येथील पोलिस विभागाचा पेट्रोलपंप रद्द करण्यात यावा, या मागणीस घेऊन स्थानिक डॉ. बी आर आंबेडकर शाळा येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले, पोलिस व प्रशासनाची पूर्व परवानगी नसल्याने पोलिसांनी उपस्थित कार्यकर्त्यांना तेथेच स्थानबद्ध करीत ताब्यात घेतले, यावेळी घोषणाबाजी करीत अनिल जवादे यांनी शहरातील आंबेडकर चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची मागणी केली. येथे पुर्वीपासुनच इतर ठिकाणावरुन आलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

परंतु पोलिस परवानगी नसल्याने स्थानिक आंबेडकर चौक येथे उपस्थित तसेच सर्व सहभागी कार्यकर्त्यांना तात्पुरते स्थानबद्ध केले व नंतर सोडून देण्यात आले.स्थानबद्ध करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमधे सर्वश्री अनिल जवादे, विजय आगलावे, सौ.शारदा झामंरे, अशोक रामटेके,अनिल मुन, रसपाल शेन्द्रें,मनोज वासेकर, अनुला सोनकुवर,कुणाल वासेकर, सौ.मंगला कांबले, आर .सी. पाटील यांचा समावेश होता.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सहभागी कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्यावतीने देण्यात आली.