मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्य ममता उर्दू शाळेत वृक्षारोपण

🔸माजी विद्यार्थी तथा शालेय समिती अध्यक्ष शेख राजू यांचा जन्मदिन साजरा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17सप्टेंबर):-मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन व माजी विद्यार्थी शेख राजू यांचा जन्मदिन जिल्हा परिषद प्राथमिक ममता उर्दू शाळेत तहसिलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर सभापती मुंजाराव मुंडे, माजी सभापती माधवराव शेंडगे, पंचायत समिती सदस्य नितीन बडे, गट शिक्षण अधिकारी बालाजी सगट, केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले, मुख्याध्यापक जावेद खान, शालेय समिती व्यवस्थापक अध्यक्ष राजू शेख, बेदेकर सर, कांबळे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताजोदीन सर यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्यांचे शिक्षण झाले. शिक्षण घेऊन त्या शाळेवर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ज्यांचा जन्मदिवस आहे असे शेख राजू यांनी आपल्या शाळेसाठी स्वखर्चातून एकूण पन्नास वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आणि तो आज प्रत्यक्षात मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण लावून संपन्न करण्यात आले. शेख राजू यांनी जन्मदिन इतर खर्च टाळून युवकांसाठी आदर्श जन्मदिवस ठरला पाहिजे व निसर्गाचे समतोल ही राखले पाहिजे असा उद्देश ठेवून त्यांनी आपला जन्मदिवस साजरा केला आहे. हा स्तुत्य उपक्रमासाठी शहाब सर, तफहिम सर, रईस सर, मोमीन सर, तबस्सुम मॅडम ,नाहीद मॅडम रजिया मॅडम व सर्व ममता उर्दू शाळेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED