कुंटूर येथे विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केला साजरा

31

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर (दि १७ सप्टेंबर) नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.क्रूषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर. येथील प्रभारी सचिव माधव मोरे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर. येथील वैद्यकीय अधिकारी श्री काशीनाथ सोनवणे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ध्वज फडकविला

ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे कुंटूर या गावच्या प्रथम नागरिक सौ.आशालता मारोतराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामसेवक श्री पुज्जरवाड साहेब, तलाठी श्री काळे साहेब, मंडळ अधिकारी श्री वहाब साहेब, क्लार्क शिवानंद रेनेवाड व किरण नालीकंठे हजर होते.

जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सिंग राजपूत सर यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुक्ती संग्रामातील लढ्यातील जेलधारक व ताम्रपत्र धारक स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव भोसले यांचे नातु नागोराव पा.भोसले यांच्या उपस्थिती सह मा.रुपेश भैया देशमुख कुंटूरकर,शिवाजी पा.होळकर, मारोतराव कदम, लक्ष्मण पा.आडकिणे, बाबुरावजी आडकिणे, मोहनराव होळकर, पत्रकार शंकर आडकिणे, बालाजी हनमंते, विनोद झुंजारे, माधव डोके व असंख्य गावकरी हजर होते.