भय्यासाहेब आंबेडकर खरा परिवर्तनवादी खंबीर नेता होते-एस के भंडारे

94

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.18सप्टेंबर):- डॉ बाबासाहेब यांचे पुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर डॉ बाबासाहेब यांची सामाजिक परिवर्तनवादी चळवळ पुढे नेण्यासाठी मोठे योगदान दिले. मुंबईतील वरळी येथील 1974 ची जातीय दंगलीच्यावेळी स्वतः बाहेर पडून वरळीच्या रस्त्यावर येऊन आंबेडकर अनुयायांना शस्त्राला शस्त्राने उत्तर द्या असा आदेश दिल्यावर विरोधकांनी केलेली दंगल शमली होती, तसेच नागपूर मधील सन 1962 ची मुस्लिम व आंबेडकरवादी दंगली च्या वेळी दोघांनाही भेटून शांतता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न केले होते.

असे , भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव तथा समतासैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी आद. भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 44 व्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा , नाशिक पश्चिम जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात सांगितले तसेच आद. भय्यासाहेब यांची विधान परिषदेवर निवड झाली त्यावेळी दि.24/7/1960 रोजीच्या सत्कार कार्यक्रमात माझा सत्कार करण्याऐवजी बाबासाहेबांच्या संघटना बळकट करा असे भय्यासाहेब बोलल्याचा संदर्भ देऊन भय्यासाहेब हे बाबासाहेबांचे खरे अनुयायी होते असे एस के भंडारे यांनी सांगितले. तसेच आंबेडकरी चळवळ ही लोखंडाचे चणे पचविणारी चळवळ आहे असे भय्यासाहेब यांनी भागवत जाधव आणि रमेश देवरुखकर यांच्या दि.11/1/2077 रोजीच्या श्रद्धांजली सभेत सांगितले होते. डॉ बाबासाहेबांच्या महापरनिर्वाणानंतर दिल्लीतील घरी गेल्यावर भय्यासाहब यांच्यावर बाबासाहेबांच्या म्हणजे स्वतः च्या बापाच्याच घरात चोरी केल्याचा आरोप करून त्यांना कोर्टात उभे केल्याचे पातक दिल्लीत केले होते. एवढेच काय राजगृह ची कोर्टाने ठरवून दिलेली अर्धी किंमत (एक लाख ऐशी हजार ) देऊन विकत घ्यावे लागल्याचे भंडारे यांनी सांगितले.

त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लोकांनी कर्जाऊ पैसे सुद्धा दिले नाही व राजगृहचा ताबाही दिला याची कथाही सांगितली. भय्यासाहेब यांना लोकांनी मदत/ सहकार्य करायच्या ऐवजी त्रास दिला व बदनामच केले. त्यांची चांगली बाजू सांगितली गेली नाही अशी खंत व्यक्त केली. डॉ बाबासाहेबांच्या चैत्य भूमी साठी लोकांनी स्टेट बँकेत रांगा लावून तीन नेत्यांच्या नावे पैसे भरले परंतु ते चैत्य भूमी साठी वापरले नाही शेवटी भय्यासाहेब यांनीच महू ते चैत्यभूमी भिमज्योत काढून निधी गोळा करून आजची चैत्यभूमी बांधली आहे.

भय्यासाहेबांचा जन्म, शिक्षण,आजारपण, जनता व प्रबुद्ध भारत च्या माध्यमातून पत्रकारिता, डॉ.बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण नंतरची धम्म चळवळ, भूमिहीनांचा सत्यागृह,आमदार,रिपब्लिकन ऐक्य इत्यादी बाबत केलेल्या कार्याचा आलेख भंडारे यांनी दोन तासाच्या प्रदीर्घ व्याख्यानात मांडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पगारे होते व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ जगताप यांनी केले. या विषयासाठी नासिक, पुणे, मुंबई, सोलापूर येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.