अनखोडा येथे बिबट्याने कोंबड्या केले फस्त

27

🔸आष्टी परिसरात वन्यजीव फिरते पथकाकडून जनजागृती

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.18सप्टेंबर):;तालुक्यातील आष्टी शहराजवळ असलेल्या अंनखोडा येथील.मारोती झरकर चंदूजी चहारे यांच्या घरी बिबट्याने कोंबड्यावर रात्र आठ वाजता चे दरम्यान हल्ला करून कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली या चपराळा अभयारण्यात बिबट्याने मानवी हल्ले व कोंबड्या-बकऱ्या गाई पकडण्याचे आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आष्टी परिसरातील नागरिक नागरिकांकडून जोर धरत आहे आष्टी परिसरात वन्य जीव फिरते पथकाकडून जनजागृती करण्यात येत आहे परंतु या बिबट्याला जेरबंद केल्याशिवाय उपाय नाही शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे मुश्किल झाले आहेत करिता वन विभागाने लक्ष देऊन या बिबट्याला जर बंद करावे अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून होत आहे