गाढवाचा वापर करून वाळू चोरीचे प्रमाणात मोठी वाढ

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-येथील वाळूचे धक्के बंद झालेले असताना गंगाखेड येथील गोदावरी नदीतून वाळू चोरीचे प्रमानात वाढ झालेली दिसून येत आहे गाढवावर वाळू वाहून विकण्यास परवानगी कोणी दिली आहे का?आसा प्रश्न जनतेमध्ये चर्चा चा विषय बनला आहे.गंगाखेड येथील गोदावरी नदी पात्रातून दररोज पाण्यातून वाळू काडून गाढवाच्या सह्याने वाळूचा उपसा करणे चालु असून चढत्या भावात नांगीकांना घर बांधकामासाठी विकली जात आहे.

वाळूचे एक गाढवाचा दर 70 ते100 रुपये प्रमाणे वीकली जात असून नागरिकांची आर्थिक लूट होत असून समदीत प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करताना दिसते सकाळ पासून वाळू गाढवावर वाळू वाहून विकण्याचा प्रकार सरास चालू असतो परंतु समदीत प्रशासन मात्र झोपीचे सोंग करताना दिसते. गाढवार कार्यवाही करत असताना गाढवाचे मालकावर सुद्धा कार्यवाही करतीलका हा चर्चाचा विषय बनला आहे.