गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मागणीचे दिले निवेदन

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. नवाबजी मलिक साहेब व आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूर्णा, पालम व गंगाखेड तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ४० हजार रुपये, पुराच्या पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीचे सपाटीकरण करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी १ लक्ष रुपये, फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सांगली सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर प्रति हेक्‍टरी १ लक्ष रुपये, क्षतिग्रस्त घराचे पुनर बांधकामाकरिता २ लक्ष रुपये व जीवित हानी झालेल्या गुराढोरांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना वेगळी आर्थिक मदत करण्याच्या मागणीचे निवेदन आ. गुट्टे साहेबांनी पालकमंत्र्यांना दिले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी, आंचल गोयल मॅडम, उपविभागीय अधिकारी श्री सुधिर पाटील,तहसीलदार, जि.प.सदस्य राजेश फड, महसूल मधील सर्व अधिकारी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.