BBMAK संघ व धनश्री ग्रुपच्या वतीने प्रशिक्षणार्थी ना शिलाई मशिन व प्रमाणपत्राचे वाटप

28

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.19सप्टेंबर):– BBMAK SANGH INDIA व धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित धनश्री महिला सक्षमीकरण केंद्र मोडणींब या प्रशिक्षण सेंटर मध्ये शिलाई मशिन प्रशिक्षण कोर्स पुर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशीन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम मोडणींब येथील राज इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सांस्कृतीक हाँल मध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाला कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबईचे सचिव तथा नवक्रांती शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.धंनजय घुले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

या प्रसंगी बोलताना BBMAK SANGH INDIA परीवाराचे तथा धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे म्हणाले,कोरोना काळात देशातील लाखो उद्योग बंद पडले असून दिड कोटी जनतेचा रोजगार गेला आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे BBMAK संघाची स्थापनाच मानवता हा एकच धर्म आणि आर्थिक मागास एकच जात व यांचा सर्व पातळीवर सर्वांगीण विकास याच उद्देशाने करण्यात आली असुन बेरोजगारीची संख्या कमी करायची असेल तर पुस्तकी ज्ञाना सोबतच रोजगार निर्माण करणारे शिक्षण घेणे ही आज काळाची गरज आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या महिला भगिनींनी नोकरीच्या मागे न धावता कौशल्य आत्मसात करुन स्वयंरोजगार सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे, धनश्री एज्युकेशन ग्रुपने मोडणींब मध्ये राबवलेला हा प्रोजेक्ट आपल्या समोर यशस्वी करुन दाखवला आहे.

‘मोडणींब पँटर्न’ धनश्री एज्युकेशन ग्रुपचे मँनेजिंग डायरेक्टर दिपकरावजी काळे तसेच धनश्री ग्रुपचे महा. प्रकल्प संचालक अजितजी केळकर यांचे मार्गदर्नाखालील महिला सक्षमिकरण विभागाच्या सौ. सुजाता गलांडे, शिलाताई डावरे तसेच विभाग प्रमुख सौ. रेखाजी बागुल, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष वनिता कोरटकर यांच्या नेतृत्वाखालील टिमच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल.धनश्री ग्रुप माढा तालूक्यात लवकरच विविध प्रशिक्षण सुरु करणार असुन तालुक्यातील बेरोजगार युवक, युवती व गृहीणी महिलांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार उभारावा आपण जर सक्षम झाला तरच समाज सक्षम होईल, पर्यायाने गाव जिल्हा राज्य व देश सुध्दा सक्षम झाल्या शिवाय राहाणार नाही, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, तर बहुजन सत्यशोधक संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी ओहोळ यांनी महिलांनी शिक्षणाची कास धरुन स्वतःच्या कुंटुबाच्या प्रगती कडे लक्ष द्यावे.

टीव्हीच्या मालिकेतील नट नट्यांच्या लग्नाच्या तारखा लक्षात न ठेवता धनश्री सक्षमिकरण केंद्रात तेवढा वेळ प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या मुलीच्या खर्चाच्या तरतुदी साठी स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा तसेच BBMAK संघ व धनश्री ग्रुपच्या अशा प्रकारच्या समाज हिताच्या कार्याला बहुजन सत्यशोधक संघांचे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सहकार्य करेल असे म्हटले तर मोडणींब ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्ताभाऊ सुर्वे यांनी BBMAK संघांचे काम हे अतिशय उत्कृष्ट असुन ते आम्ही स्वतः अनुभवत असुन कोरोणा काळात मोडणींब शहरात सर्व पक्ष व संघटनांनी केलेल्या समाज कार्याबद्दल संटनेने सर्व मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन उचीत सन्मान करुन आमच्या कामाचे कौतुक केले आहे. धनश्री ग्रुपने मोडणींब मधील जनतेला दिलेला शब्द प्रसंगी तोटा सहन करुन शिलाई मशिन देऊन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून खरा करून दाखविला. त्यामुळे संस्थे विषयी सर्वसामान्य जनतेमध्ये चांगला संदेश गेला असुन आज मोडणींब येथील महिलांना प्रशिक्षण व प्रमाण पत्राबरोबरच शिलाई मशिन देऊन त्यांना खरोखरच सक्षम व स्वावलंबी बनविले बद्दल धनश्री एज्युकेशन ग्रुपच्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. समाज विकासाच्या कार्यासाठी संस्थेस नेहमीच सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

उमाताई वाळके यांनी आपल्या मनोगतात धनश्री ग्रुपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राबविले जात असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी धनश्री ग्रुपच्या महिला सक्षमिकरण विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा सौ. वनिताताई कोरटकर यांनी महिलांसाठी संस्थेने अंगणवाडी, बालवाडी शिक्षिका कोर्स , समाजसेवक , पत्रकारीता कोर्स तसेच असिस्टंट नर्सिंग सारखे विविध रोजगार प्रकल्प सक्षमिकरण प्रमुख रेखाताई बागुल, शिलाजी डावरे तसेच माधुरी उदावंत यांचे नेतृत्वाखाली सक्षम टिम संपुर्ण राज्यभर काम करीत असुन या प्रकल्पांना जनतेचा व महिलांचा प्रतिसाद मिळत आहे, याबरोबरच धनश्री ग्रुपने शिक्षणाचे महत्व ओळखुन अंगणवाडी ते 7 वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना प्रति दिन दोन रुपये खर्चात घरी बसुन शिक्षण घेता यावे यासाठी अतिशय उत्कृष्ट असे इ-लर्निग अँप विकसित केले असुन सर्व पालकांनी आपल्या पाल्यासाठी या अँपचा वापर करणेचे आवाहन केले.

या प्रसंगी आपले अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना कौशल्य विकास बोर्डाचे सचिव धनंजय घुले यांनी BBMAK संघ व धनश्री ग्रुप ने 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही जाती धर्माच्या सुशिक्षित बेरोजगारांना मागेल त्याला प्रशिक्षण व 100% टक्के रोजगार उपलब्ध करुन देणेचा दोन्ही संस्थांनी संयुक्त उपक्रम सुरु केला असुन शिका आणी कमवा योजनेतुन हाँटेल मँनेजमेंट, नर्सिंग असिस्टंट तसेच केअर सेंटर असिस्टंट नर्सिंग सारखे विविध 184 क्षेत्रातील उद्योगामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यात आल्या असुन सर्वानी याचा फायदा घ्यावा तसेच BBMAK संघ व धनश्री ग्रुप ने दिलेला शब्द कोरोना सारख्या संकट काळात सुद्दा खरा करुन दाखविला असुन आपल्या साठी ही एक सुवर्ण संधी आहे. कौशल्य विकास बोर्डाने 184 प्रकारचे विविध शैक्षणिक प्रोजेक्ट धनश्री ग्रुपला दिले असुन 18 ते 40 वयोगटातील बेरोजगारांच्या हाताला यातुन काम उपलब्ध होणार असुन गरजुंनी यासाठी बेरोजगार कामगार संघ व धनश्री ग्रुपला संपर्क करुन रोजगार मिळवावा असे उपस्थितांना आव्हान केले. या प्रसंगी मशिन मिळालेल्या महिलांनी अतिशय संकट काळात धनश्री ग्रुप ने मशीन उलब्ध करुन देऊन रोजगार निर्मीतेचे करणेचे साधन उपलब्ध करुन दिले बद्दल धनश्री ग्रुपच्या मान्यवरांचे आभार मानले.पाहुण्यांचे स्वागत प्रताप रणदिवे (संचालक :- धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन & स्किल डेव्हलपमेन्ट ) तसेच सेंटर प्रमुख सौ अक्षदा निचाळ यांनी केले तर शिलाई मशिन प्रशिक्षणार्थी कु. व्यवहारे यांनी सुत्र संचलन केले तर आभार धनश्री सक्षमिकरण सेंटर प्रमुख सौ.अक्षदा मँडम यांनी आभार मानले.