मुलीला वाचवायला विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू

36

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव येथे विहिरीत पडलेल्या आपल्या मुलीला वाचवायला धावून विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू झाला.विशेष म्हणजे विहिरीतून पाण्या बाहेर काढल्या नंतर मुलगी आईच्या कुशीत आढळून आली.या बाबत अधिक माहिती अशीकी बाणेगाव (ता. केज) येथे घडलेल्या घटनेतील आशा सुंदर जाधवर (२२ वर्ष) व कु. शांभवी सुंदर जाधवर ( दीड वर्ष) अशी त्या माय – लेकीची नावे आहेत.श्रीमती आशा जाधवर यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता.

आशा जाधवर व सुंदर जाधवर हे दोघेही शिक्षक असून पुण्यात वास्तव्यास होते.वर्षभरा पूर्वी सुंदर जाधवर यांना कोरोनाची लागण झाली होती.यातच उपचारा दरम्यान सुंदर जाधवर त्यांचे निधन झाले. पती सुंदर जाधवर यांच्या जाण्याने आशा जाधवर विरहात होत्या. दोन दिवसां पूर्वी त्या त्यांची दीड वर्षाची चिमुकली मुलगी शांभवीसह त्या माहेरी बाणेगावला आल्या होत्या.दि. १६ सप्टेंबर रोजी आशा जाधवर यांचे वडील बाहेरगावी गेले होते. तर आई शेती कामात व्यस्त होती.
दुपारी ४:०० वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा जाधवर या शेतात गेल्या.या वेळी खेळता-खेळता कु. शांभवी ही विहिरी जवळ गेली हिरीत पडताच आशा जाधवर यांनी तिला वाचविण्यासाठी स्वतः विहिरीत उडी मारून मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात दोघींचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करून प्रेत पाण्याबाहेर काढले. त्यावेळी माय लेकीचे मृतदेह आढळून आले.या वेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती.तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे असल्याने बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या.नांदूरघाट येथील ग्रामीण रूग्णालयात दोघींचेही शवविच्छेदन करून नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर दोघी मायलेकीवर अंतिम संस्कार केले.या घटनेने बानेगावसह नांदूरघाट परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.