महात्मा गांधी, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे महापुरुष होते

24

🔹केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले पुतळा स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड दि.18 सप्टेंबर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ गोलमेज परिषदेत इंग्रजांनी मान्य केले होते.
मात्र महात्मा गांधी यांचे प्राण वाचविण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींसमवेत पुणे करार केला होता.

त्यानुसार स्वतंत्र मतदारसंघा ऐवजी दलितांना आरक्षण देण्याचे सर्वांनुमते मान्य होऊन आरक्षण संविधानात समाविष्ट करण्यात आले.तसेच जेंव्हा भारताच्या संविधान निर्मिती ची वेळ आली तेंव्हा महात्मा गांधी यांनी संविधानाच्या मसुदा समिती च्या अध्यक्षपदासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुचविले होते.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी लढत होते तसेच भारताच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लढत होते.

दोन्ही महापुरुषांमुळे भारत घडला आहे. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेकांचा आदर करणारे एकमेकांवर विश्वास असणारे महापुरुष होते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

उमरखेड येथे महात्मा गांधी आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण ना रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री मदन येरावर, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे; भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, रिपाइं चे ज्येष्ठ नेते सुधाकर तायडे, मोहन भोयर, रिपाइं यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर,

शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एक पर्यटन स्थळ निर्माण झाले. अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहे.तसेच उमरखेड शहर व तालुक्यातील हजारो आंबेडकर प्रेमी समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या.

प्रा. अनिल काळबांडे, कुमार केंद्रेकर, सिध्दार्थ दिवेकर, श्याम धुळे, प्रफुल दिवेकर, सुधाकर लोमटे सर, अमोल जोगदंडे, माही धुळेकर, नितीन आठवले, शुद्धोधन दिवेकर, उमरखेड विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ बरडे, पुसद तालुका कार्यकारणी, बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, अंबादास वानखेडे, दिलीप धुळे, भीमराव गणपत कांबळे जयराम माथणे कैलाश श्रावने आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.