पोलीस कर्मचाऱ्याच्या पार्थिवाला पोलीस आयुक्तांचा खांदा

44

🔸हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस प्रतिक जाधव यांचे निधन

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.19सप्टेंबर):-नाशिक शहर पोलीस दलात दंगा नियञंण पथकाचे कर्मचारी प्रतिक विलास जाधव वय वर्षे ३१ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना शहर पोलीस आयुक्त दिपक पांङेय यांनी जाधव कुटुंबियांचे घरी धाव घेत सांत्वन केले इतकेच नाही तर जाधव यांच्या पार्थिवाला खांदा देत अत्यंविधी पार पडेपर्यंत जाधव कुटुंबियांला धीर दिला. छातीत दुखत असल्याने जाधव खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेले असता रूग्णालयाच्या काऊंटरवरच हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

शहर पोलीस आयुक्तलयात घटनेची माहिती मिळताच पथकाच्या वरीष्ठ निरीक्षक यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत पोलीस आयुक्त दिपक पांङेय यांना ही घटना कळविण्यात आली. पाङेय यांनी दैनंदिन मिटींग रद्द करत जाधव कुटुंब यांच्या घरी धाव घेतली सायकांळी पाच वाजेपासुन राञी उशीरा पर्यंत थांबून कुटुंबीय धीर दिला जाधव यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या अंत्ययाञेत सहभागी होत पाथिॅवाला खांदा दिला.पोलीस दलाचे प्रमुख म्हणून अत्यंविधी प्रसंगी अङीच तास आङगाव स्मशानभूमीत जाधव यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त मधुकर गावीत,वसंत मोरे, वरीष्ठ पो लीस निरीक्षक इरफान शेख, सह पोलीस दलातील सहकारी उपस्थित होते प्रतिक जाधव यांच्या पश्चात आई वङील, पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी विलास जाधव यांचे चिरंजीव असुन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असे ह्यावेळी समजले. गणेशोत्सव काळातच जन्म आणि मृत्यू, प्रतिक जाधव यांचा जन्म गणेशोत्सव काळात झाला होता त्यामुळे चुलते दिलीप जाधव यांनी गणेश नाव ठेवले होते आङगाव व परिसरात गणेश नावाने परिचित होते आणि जाधव यांचा दशक्रिया विधी २६ सप्टेंबर रोजी असुन याच दिवशी त्यांचा जन्म दिन असल्याने नातेवाईक व मिञ परिवार अधिकच शोकाकुल झाला आहे