बनसारोळा महाराष्ट्र अंनिसची नूतन कार्यकारिणी जाहीर

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

केज(दि.20सप्टेंबर):- तालुक्यातील बनसारोळा येथे आज दि,१९ रोजी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बनसारोळा शाखेचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून युवराज काकडे, उपाध्यक्ष म्हणून शिवाजी पवार,कार्याध्यक्ष म्हणून संतोष आदुडे तर प्रधान सचिव म्हणून सारिका तट यांचे निर्वाचन करण्यात आले. या प्रसंगी मध्यवर्तीतर्फे निरिक्षक म्‍हणून सांस्कृतिक विभाग राज्य कार्यवाह मनोहर जायभाये आणि बीड जिल्हा प्रधान सचिव सुधाकर तट  उपस्थित होते.

  याप्रसंगी मा. मनोहर जायभाये सर यांनी अंनिसची पंचसूत्री सांगून संत आणि समाजसुधारकांचे अंनिसच्या कामातील योगदान याबद्दल माहिती दिली तर सुधाकर तट यांनी संघटना बांधणी व  पदाधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले. राज्‍य निरीक्षक मनोहर जायभाये, सुधाकर तट यांनी सर्वानुमते नूतन  कार्यकारिणी निवडीत उर्वरीत कार्यकारिणी पुढील प्रमाणे घोषित केली:

 विविध उपक्रम कार्यवाह: उमाकांत गोरे ,कायदे विषयक सल्‍लागार: अॅड बालाजी चौधरी, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्‍प: शशिकला काकडे, उद्धव काकडे ,बुवाबाजी विरोधी संघर्ष: बालाजी भुजबळ, सुग्रीव जोगदंड,सांस्‍कृतिक अभिव्‍यक्‍ती: तुकाराम सुवर्णकार ,युवराज घोगरे,  युवा सहभाग विभाग:तुकाराम पांचाळ, महिला सहभाग: संगीता देवकते , प्रशिक्षण विभाग: अनिल जोगदंड,मानसिक आरोग्‍य विभाग, श्यामसुंदर काकडे ,अंधश्रध्‍दा निर्मूलन पत्रिका,  रमेश सोनके, अमोल बाळासाहेब काकडे, प्रकाशने वितरण :-समीर तांबोळी  ,जातिअंत संकल्‍प विभाग, १)मिश्रविवाह- रशिकांत जोगदंड, २)जोडिदाराची विवेकी निवड:-  महेश शिंदे, लक्ष्मण शेलार ३) जातपंचायत मूठमाती अभियान,साईनाथ जोगदंड, रंजीत कसबे ,  निधी संकलन ,तानाजी जोगदंड, रविराज शिंदे सोशल मिडीया विभाग प्रमुख,धिवार राजकुमार यांची निवड करण्यात आली.  शेवटी नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संतोष आदुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

बीड, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED