जागतिकीकरणानंतर दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीचे महत्व वाढत आहे – डॉ.अजय धोंडे

24

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.20सप्टेंबर):-हिंदी आपल्या देशाची कायद्याने राजभाषा आहे परंतु जनसामान्यांच्या दृष्टीने ती राष्ट्रभाषाच आहे.जागतिकीकरणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दिवसेंदिवस हिंदीचे महत्त्व वाढत आहे.हिंदीचे महत्व ओळखून आपणही हिंदी शिकावी,तिचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करावा व जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डॉ.अजय दादा धोंडे यांनी केले.ते भगवान महाविद्यालयाच्या हिंदी सप्ताह सांगता समारंभामध्ये’ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी राज्यशास्त्र या विषयांमध्ये पी.एच.डी.ही उच्च शिक्षणातील सर्वोच्च पदवी मिळविल्याबद्दल प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ व उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब ढोबळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ हे होते.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.वाघ यांनी अनेक भाषी लोक असलेल्या या देशामध्ये सर्वांना एकसंग बांधण्याचे काम राष्ट्रभाषा हिंदीने केले आहे व भविष्यात करत राहील त्यामुळे आपण हिंदीचे महत्व जाणून तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाचे संयोजक हिंदी विभाग प्रमुख डॉ.आप्पासाहेब टाळके यांनी १४ ते २० सप्टेंबर २०२१ या सप्ताहामध्ये हिंदी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन या कार्यक्रमांचा आढावा घेऊन हिंदीच्या आजच्या सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले.याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब ढोबळे,प्रा.संभाजी झिंजूर्के,प्रा.केशव शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विचारपीठावर उपप्राचार्य प्रा.भागिनाथ बांगर,प्रा.भाऊसाहेब ढोबळे,प्रा.डॉ.आप्पासाहेब टाळके हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्रीरंग पवार यांनी केले तर सर्वांचे आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.आप्पासाहेब टाळके यांनी मानले.या कार्यक्रमासाठी भगवान महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.भागिनाथ बांगर,प्रा.डॉ.दिगंबर पाटील,प्रा.डॉ.बाबासाहेब झिने,प्रा.डॉ.रामदास कवडे,प्रा.डॉ.अनिल हजारे,प्रा.श्रीकांत धोंडे,प्रा.आबासाहेब पोकळे,प्रा.काकासाहेब सोले,पत्रकार दिगंबर बोडखे यांचे हिंदी विभागाला विशेष सहकार्य लाभले.