जास्तीतजास्त नवमतदारांनी करावी नोंदणी, निवडणूक आयोगाचे नागरिकांना आवाहन

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):-वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. आगामी महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायती आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगातर्फे पुर्ननिरीक्षण कार्यक्रमानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दावे व हरकती विचारात घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्या अनुषंगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अथवा निवडणूक लढविण्यासाठी जास्तीत नवमतदारांनी ( १८ वर्षे पूर्ण झालेला नागरिक) आपली नावे वेळीच मतदार यादीत नोंदवावी तसेच आधीच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनी काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी अर्ज करावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.