तंटामुक्त गाव समिती मार्कंडा कंनसोबा कडून निरोप समारंभ तथा कोविड योद्धा सत्कार समारंभ

44

🔹सत्कारमुर्ती ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार यांचा साप्तनीक सत्कार

✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)9404071883

चामोर्शी(दि.21सप्टेंबर):- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा कंनसोबा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार हे रुजू झाल्यापासून पाच वर्ष उत्कृष्ट सेवा दिली असल्याने ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार यांना तंटामुक्त गाव समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन कोविड योद्धा तथा निरोप समारंभ मोठया थाटामाटात साप्तनीक सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ संगिता पोटे तंटामुकत अध्यक्ष हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन श्री प्रभाकरजी लोणारे. माजी ग्रामपंचायत सदस्य सौ तानाबाई परचाके माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती वर्षाताई बावणे दारूबंदी समीती सदस्य याच्या उपस्थीत निरोप समारंभ व कोविड योद्धा सत्कार समारंभ पार पडला.

सत्कारमुर्ती ग्रामसेवक श्री राजकूमार अनंतूलवार हे मार्कंडा कंनसोबा ग्रामपंचायतीला रुजू झाल्यापासून गावात उत्कृष्ट कार्य केले असून कोरोणाच्या काळात यांनी महत्त्वाची कामगिरी केली परराज्यातून आलेल्या मजुरांना व्यवस्थित कवारंटाईम ठेवून त्यांच्या दररोज भेटी देऊन कोरोनाविषाणू बाबतीत आपण आपली जबाबदारी कशी घ्यावयाची याबद्दल मार्गदर्शन करीत राहायचे मार्कंडा कंनसोबा येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीचे नियोजनबद्ध निवारण करीत होते व तंटामुक्त गाव समितीला नेहमी सहकार्य करीत असायचे म्हणून कोविड योद्धा तथा निरोप समारंभ आयोजित करून साप्तनीक सत्कार करण्यात आल्याचे असे निरोप समारंभाप्रसंगी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सौ संगीता पोटे या बोलत होत्या.

आता ग्रामसेवक श्री राजकूमार अनंतूलवार हे पदोन्नती मिळाल्याने ग्रामविकास अधिकारी म्हणुन गामसचिवालय आष्टी येथे रूजू झालेत असून यावेळी उपस्थितांनी त्याच्या पूढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रभाकरजी लोणारे. सुरेश मोहुरले. बंडू गुंडावार. वैशालीताई बावणे. तानाबाई परचाके. अमोल कुबडे. राजू पोटे. पत्रकार भास्कर फरकडे. प्रभाकर बावणे. दामोधरजी पोटवार.सूजाता गुंडावार वसंत बावणे. रविंद्र कोवे माजी उपसरपंच व तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते