स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचा निरोप समारंभ

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21सप्टेंबर):-गंगाखेड येथून जाफराबाद याठीकाणी स्वरूप कंकाळ यांची प्रशासकिय बदली झाल्यामुळे त्यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा परभणी व तालुका गंगाखेड यांच्यावतीने 20 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय याठीकाणी निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप फड, तालुका उपाध्यक्ष गोविंद काळे व संघटनेतील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

स्वस्त धान्य रेशन दुकान दारांना कोविडचा प्रादुर्भाव असताना गोरगरीब जनतेला रेशन मिळणेही अत्यंत आवश्यक असल्याने ते कशा पद्धतीने आपण वाटप करायचे रेशन दुकानदार व त्यांच्या परिवाराची कशाप्रकारे काळजी घ्यायची कोविडचा प्रादुर्भाव होणार नाही याची पण काळजी घेऊनच रेशन कसे वाटप करायचे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी कोविड काळात केले होते.

रेशन दुकानदाराच्या मनातील कोविड बद्दलची भीती काढून टाकून धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा अनेक प्रकारच्या अडचणीवर रेशन धान्य दुकानदारास मार्गदर्शन करून रेशन धान्य दुकानदाराच्या अडचणी त्यांनी सोडल्याबद्दल स्वस्त धान्य रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दिलीप फड व गंगाखेड तालुका उपाध्यक्ष गोविंद काळे यांच्या वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पहार घालून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निरोप देण्यात आला.