लाडेगाव प्रकरणी सर्व दलित संघटनाचे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली आमरण उपोषण सुरू

31

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

केज(दि.२१सप्टेंबर):- केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत.लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र आले आहेत. दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी ११:३० वा. केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. 

उपोषणार्थींच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. त्या मागण्या अशा आहेत; युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे व बिट जमादार डोईफोडे यांना निलंबित करावे. दलित समाजातील अतिक्रमण धारकांना विरोध करण्यासाठी या गायरान जमिनीवर राबविण्यात येणार असलेले वनीकरण आणि नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा. गायरान जमिनितील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. गायरान जमिनीशी अर्था-अर्थी काही एक संबंध नसणारे सवर्ण समाजातील गावगुंड हे दलित समाजावर अन्याय करीत असताना व त्यांच्यावर अट्राॉसिटी चे गुन्हे गुन्हे दाखल असतानाही पोलिस प्रशासन अटक करून कार्यवाही करीत नसल्याने दलित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच लाडेगाव येथील गायरान जमीन कसत असलेला दलित समाज हा गुन्हेगारी प्रवर्गातील नाही,तरी आकसापोटी त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले गेले आहेत.याचा योग्य तपास करून गुन्हे रद्द करावेत त्यामुळे प्रशासनाने सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेण्याचा प्रयत्न करावा.

या मागण्यांसाठी केज तहसील समोर गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ,निलेश साखरे,रोहित कसबे, सुरेश शिरसट,अजय भांगे, विशाल धीरे दीपक धीरे,उनकेश्वर धीरे,दिगांबर नवगिरे, नागेश धीरे,सुशील धीरे,अमोल धीरे, हरिभाऊ धीरे, वैजनाथ धीरे,जीजाराम धीरे, लक्ष्मण धीरे,मीना धीरे, अरविंद धीरे, परिवार धीरे,परसराम धीरे, रमेश निशीगंध इत्यादी भर पावसात मौजे,लाडेगांव गायरान धारक केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.