गुंड प्रवृत्तीच्या नेत्याची तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकाला ठाणेदाराने दिली जीवे मारण्याची धमकी

🔸गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस स्टेशन येथील प्रकार

🔹गुंड प्रवृत्तीच्या नेत्यावर गुन्हा नोंद करा विजय येवले यांची मागणी

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी प्रतिनिधी)

गोंडपिपरी(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) येथील रहिवासी विजय येवले (वय ३५ ) गावातील जबाबदार व्यक्ती लोकप्रतिनिधी या नात्याने माजी सभापती दीपक सातपुते ,सरपंच जया दिपक सातपुते यांच्या घरी दि. १२ रविवारी सायंकाळच्या सुमारास घरी भेट दिली. गावात अनेक काम सुरू असून दीपक भाऊ तुम्ही मला देखील काम द्या मी देखील तुमचा कार्यकर्ता आहो अशी मदत मागितली. तेव्हा भाजपा नेते दीपक सातपुते यांनी येवले यांना कसलेही काम नाही उत्तर दिले.त्यानंतर देखील विजय येवले यांनी कामासाठी विनवणी करत काम द्या असा तगादा लावला.

त्यानंतर चिडून दिपक सातपुते यांनी येवले याला बेदम मारहाण केली.मारहाण केल्यानंतर विजय येवले तिथेच थांबले असता शेजारी काही सहकाऱ्यांना बोलावून याला मारा काही होईल तर मी सांभाळणार असे म्हटल्यावर जया सातपुते, बळीराम एकोनकर, सुवर्णा एकोनकर,वासुदेव ऐकोनकर,मोहन चौधरी सर्व रा. सोनापुर (देशपांडे) यांनी विजय येवलेला बेदम मारहाण केली. त्याच दरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिपक सातपुते यांनी येथील लाठी येथील ठाणेदार पारडकर यांना तिथे बोलावले ठाणेदाराने घटनास्थळ गाठून झालेला प्रकार न जाणून घेता १० ते १२ काठ्या येवले याला मारल्या.

गंभीर दुखापत व शरीर सर्व सुजल्याने येवले घराच्या बाहेर निघू शकले नाही परंतु 14 तारखेला येथील पोलीस स्टेशन गाठून तक्रार द्यायला गेले असता तक्रार न घेता ठाणेदार पराडकर यांनी ठाण्यात मारहाण करीत पुन्हा तक्रार द्यायला आल्यास किंवा कुठेही याची वाच्यता केल्यास तुला कापून मारू आणि तुझा प्रेताच्या ठिकाणी दुसरा प्रेत तुझ्या घरी पाठवु अशी धमकी ठाणेदाराने विजय येवले यांना दिली. ठाणेदारसह गैरअर्जदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर व पोलिस अधिक्षक राजुरा यांच्याकडे केली आहे अशी माहिती विजय सदाशिव येवले यांनी गोंडपिपरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

बॉक्स-

विजय येवले याच्याविरोधात देखील तक्रार प्राप्त आहे.त्याची देखील तक्रार प्राप्त आहे.मी मारहाण केली नसून आरोपात काही तथ्य नाही.तक्रार प्राप्त झाली असून पुढील तपास सुरू आहे.

ठाणेदार- मिलिंद पारडकर(पो.स्टे. लाठी)

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED