खवातीन ए इस्लाम कडून परतेकी व इतराचा सत्कार

84

🔹शाहीन शेख याच्या कार्याने समाजाचे नाव शीखरावर

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.22सप्टेंबर):- समाजात तर समाज सेवकाची कमी नाही अनेक मार्गाने समाज सेवा करता येतात मात्र मुस्लिम समाजातील एका महिलेने समाज सेवेचे व्रत घेतले असून नाना प्रकार चे कामे करून आज त्यांनी आपलेच नाही तर समाजाचे नाव लोकिक केले आहे.नुकतेच तीन वर्षां पासून खवातीन ए इस्लाम या सेवाभावी संस्थेचे स्थापना करून त्यांनी विविध कामे केली.

यात प्रथम मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह मेळावे,बेरोजगार मुस्लिम महिला साठी पापड उद्योग,गरीब मुलांना शिक्षण,मुस्लिम धर्मा व्यतिरिक्त इतर धरमाच्या व्यक्तीचे विवाह,समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार,काही भागात पाण्याचा व्यवस्था साठी बोअरवेल ची व्यवस्था, व नुकतेच सर्व धर्मीय सर्व संघटना,सर्व पक्षीय याचे सोबत दिल्ली येथील साबिया याचेन्याय मिळण्यासाठी धारणा आंदोलन असे अनेक कामे शाहीन शेख याचे पुढाकाराने संपन्न झाले व आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शीद शेख,365 दिवस शाळा सुरू ठेवणारे राजेंद्र परतेकी सर याचा नागरी सत्कार या खवातीन ए इस्लाम संस्थेने केले आहे.

यासाठी संस्थेच्या नफीसा अंजुम, मलका शेख,मुस्कान शेख,हुमेरा खान,यांनी अथक परिश्रम घेतले असून सत्कार साठी मुख्य अतिथी नाझिम खान याच्या हस्ते सत्कार क्रीसेंट पब्लिक स्कूल संचालक advocate नाजिम खान याचे हस्ते करण्यात साले.