क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान व यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व धारेश्वर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने कोव्हिड 19 कोव्हीशील्ड लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन संपन्न

29

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.22सप्टेंबर):-क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान व यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व धारेश्वर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने कोव्हिड19 कोव्हीशील्ड लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन 21 सप्टेंबर 2021रोजी सकाळी 9ते सायंकाळी 5 या कालावधीत पुण्यातील येथील धायरी येथील वीर बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते .या मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी हवेली तालुका शिवसेनाप्रमुख व धारेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना रायकर, खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण चे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता डांगे, श्याम रायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा शिल्पा यादव, सारिका लोखंडे, रोहित रायकर, बाळकृष्ण डावखर, विकास गायकवाड, भाग्यश्री कामठे ,प्रियंका गुजराथी ,राजश्री पाटील, मीना भोसले ऋतुजा गोंधळी ,साक्षी डांगे, डॉली जावलीकर आदी मान्यवर उपस्थित होते .या शिबिरामध्ये 1000 लोकांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वीस हजार लोकांपर्यंत लसीकरण शिबिराच्या माध्यमातून पोहोचण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुनीता डांगे तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात अग्रेसर आहेत, ह्या महिन्यात त्यांनी रक्तदान,आरोग्य शिबीर, पूरग्रस्तांना मदत ,आदिवासी लोकांना अन्नधान्य किट वाटप सुवर्णप्राशन कॅम्प घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि हा अकरावे शिबीर घेऊन 10,000 पेक्षा जास्त लोकांना लस उपलब्ध करून दिली.कोविड काळात सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.