भीम टायगर सेना सोशल मिडिया यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सिध्दार्थ दिवेकर

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)मो:-8806583158

उमरखेड(दि.22सप्टेंबर): – सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड यांची भीम टायगर सेना सोशल मिडिया यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी मा. दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीटासे) यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे.

यावेळी यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे, उमरखेड तालुका संपर्क प्रमुख कुमार केंद्रेकर, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपालदादा सावतकर, विलाशभाऊ पाईकराव तालुका अध्यक्ष हदगाव, कैलास कदम, प्रफुल दिवेकर, राहुल पाईकराव,नितिन आठवले असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भीम टायगर सेना सोशल मिडिया यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सिध्दार्थ दिवेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी दिवेकर हे परिश्रम घेतील असा आशावाद संघटना पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED