चांदा विभाग, चंद्रपूर येथे डाक अदालतीचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23सप्टेंबर):- प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग चंद्रपूर, द्वारे सोमवार, दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी चंद्रपूरच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन केले आहे.या डाक अदालतीमध्ये चांदा विभागामध्ये पोस्ट ऑफीस संबंधीत तक्रारीमध्ये ज्या तक्रारीचे सहा हप्याक त निवारण झाले नसेल. यामध्ये पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काउंटर सेवा, बचत बैंक आणि मनिऑर्डरचे संबंधित तक्रारीवर विचार करण्यात येणार आहे.

डाक अदालतीच्या तक्रारीमध्ये जिथे तक्रार करण्यात आली होते तेथील अधिकार,नाव, पदनाम व कार्यालयाचे नाव तसेच दिनांक यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.तरी इच्छुक तक्रारकर्त्यांनी आपली तक्रार प्रवर अधिक्षक, डाकघर, चांदा विभाग चंद्रपूर-442401 येथे दिनांक 24 सप्टेंबर 2021 पर्यंत तक्रार दोन प्रतीत पाठविण्यात यावे. असे प्रवर अधिक्षक डाकघर चांदा विभाग, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
****

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED