ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे यांची नियुक्ती

29
✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24 सप्टेंबर):-अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बी.व्ही.श्रीनिवास व प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने युवक काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.त्यानुसार ब्रम्हपुरी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाकर उर्फ सोनु नाकतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंद्रपुर येथील एका कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी इरशाद शेख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे हे ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. सोबतच ते एक यशस्वी युवा उद्योजक असुन यापुर्वी ते संभाजी ब्रिगेड पक्षाचे ब्रम्हपुरी तालुका उपाध्यक्ष होते.

ब्रम्हपुरी तालुक्यातील युवकांमध्ये ते लोकप्रिय युवा व्यक्तिमत्त्व असुन त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. बेधडक, रोखठोकपणे नागरिकांची कामे करण्याची त्यांची शैली हे त्यांचे वैशिष्ट्य असुन यामुळे जनमानसात त्यांची प्रतीमा प्रभावी आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात युवक काँग्रेसला मोठी बळकटी मिळणार असुन काँग्रेस पक्षाचे विचार सर्वस्तरावरील लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने व संगठन मजबूत करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सोनू नाकतोडे यांनी सांगितले आहे.
त्यांच्या सदर नियुक्तीबद्दल ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मंगलाताई लोनबले, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार यांसह ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.