महाबँकेतील सर्व कर्मचारी संघटना 27 सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.24सप्टेंबर):- बॅक आॅफ महाराष्टातील सर्व कर्मचारी दि. 27 सप्टेंबर रोजी संपावर जात आहेत दिंनाक 25 ला शनिवार सुट्टी व 26 ला रविवाव व 27 ला संप त्यामुळे निश्चीतच बॅकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे .त्याला कारण ही तसे आहे , महाबँकेतील सर्व कर्मचारी संघटना 27 सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहोत . सर्व प्रथम आम्ही या संपामुळे आमच्या ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयींबद्दल त्यांची माफी मागत आहोत . आमचा हा संघ प्रामुख्याने नोकर भरतीच्या मागणीसाठी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बँक मृत्यू . निवृत्ती , राजीनामा , पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही . या काळात बँकेने अनेक नवीन शाखा उघडल्या , बँकेचा व्यवसाय अनेक पटीने वाढला . याचा परिणाम म्हणुन बँकेत आज 1271 अशा शाखा आहेत जेथे एकही सफाई कर्मचारी नाही तर 697 अशा शाखा आहेत जेथे एकही शिपाई नाही . यातील 448 अशा शाखा आहेत जेथे दोन्ही सफाई कर्मचारी तसेच शिपाई नाही . या शिवाय 55 अशा शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नाही तर 729 अशा शाखा आहेत जेथे फक्त एक क्लार्क आहे तर 668 शाखा आहेत जेथे फक्त दोन क्लार्क आहेत . या काळात सरकारने बँकेमार्फत अनेक योजना जनधन , अटल पेंशन , मुद्रा , स्वनिधी , विमा योजना , अनुदानाचे वाटप राबविल्या . यामुळे बँकेत कामाचा बोजा खूप वाढला . कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आजारपणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या आजारपणात देखील रजा मिळत नाही.

यामुळे कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत . याचा ग्राहक सेवेवर देखील खूप विपरीत परिणाम होत आहे . यामुळे अनेक शाखेतून क्षमता असताना देखील व्यवसाय वाढू शकत नाही . याचा बँकेच्या व्यवसायावर देखील अनिष्ट परिणाम होत आहे . या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व संघटनांनी विनंती , पाठपुरावा हे सर्व प्रयत्न विफल झाल्या नंतर नाईलाजाने हे आंदोलन सुरू केले आहे . यात आम्ही मागणी दिन पाळला . निदर्शने केली , धरणे धरली पण अद्यापही बँक व्यवस्थापनाने त्याची योग्य ती दखल घेतली नाही म्हणुन अखेर आम्हाला नाईलाजास्तव दिनांक 27 सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहोत . आम्ही ग्राहकांना असे आवाहन करतो की त्यांनी आमच्या मागण्यांना पाठींबा द्यावा ही विनंती .सदर संपामध्ये , ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना महाबँक नवनिर्माण सेना सहभागी आहेत