गंगाबाई तलमले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

32

🔸प्राचार्य मंगेश देवढगले यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 24 सप्टेंबर):-विद्यार्थ्यांमध्ये सेवेचा भाव रुजविणार रुजविणारी राष्ट्रीय सेवा योजना आजच्याच दिवशी सुरू करण्यात आली. तेव्हापासून 24 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा केला जातो. स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

मार्गदर्शन करताना प्रा. गणेश दोनाडकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नेतृत्वगुण विकसीत करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावते प्रा. संतोष पिलारे याप्रसंगी विचार व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा समाजाशी नाळ जुळलेला असून, समाजपरीवर्तनात त्याचा खारीचा वाटा आहे.

प्रसंगी प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, युवक आणि समाज यांना जोडणारा दुवा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विधायक कामे झालेली आहेत .या कार्यक्रमाचे संचालन प्रा. जयगोपाल चोले तर आभार कुलकीर्ती ठोंबरे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. पल्लवी घोंगडे, उमेश राऊत, जागृती तुपट, अश्विनी नंदपूरकर, हर्षाली कुत्तरमारे आदी उपस्थित होते.