गडचिरोली :- महामार्गावरील चिखलयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे हाल

25

🔹लवकरात लवकर काम पूर्ण करा – युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांची मागणी

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.25सप्टेंबर):- गेल्या अनेक दिवसापासून चामोर्शी शहरातील मुख्य रस्त्याचे काम अतिशय मंद गतीने सुरू असून आता महामार्ग वरील चिखलामुळे नागरिकांना आवागमन करताना तारांबळ उडत आहे त्यामुळे ठेकेदाराची कामाला गती देऊन काम त्वरित पूर्ण करावी अशी मागणी युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी च्या वतीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांचेकडे निवेदनातून केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे चामोर्शी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून येथे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येत असतात चामोर्शी येथील मुख्य ठिकाणी परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा असल्याने येथे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्या करिता विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते आहे.

दोन्ही बाजूंनी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते रस्त्याची एक बाजू खोलीकरण करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी पाणी साचून असल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे करिता कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये व सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शिच्या वतीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

यावेळी उपस्थित युवा संकल्प ग्रुप शाखा-चामोशीँ चे प्रमुख सुरज नैताम उपप्रमुख प्रशांत चुदरी सदस्य अजय भाडेंकर, सुरज चौके, विजय भाडेकर, प्रशिक नदेश्चवर, ध्रुप चिचघरे, डॉ विशाल सहारे, अजय बुराडे, सुरज सोयाम, कातिँक चौके, भुषण बारसागडे, ज्ञानेश्वर लटारे, शंतनु पिपरे, राहूल. चिचघरे, सचिन कुनघाडकर, अनुराग बन्सोळ,सपनिल चिचघरे, आदी उपस्थित होते