चामोर्शी :- निवडून येऊन खुर्ची पुरते मर्यादित न राहता लागले शेतकऱ्यांच्या कामाला- कर्तव्यशील ग्रामपंचायत सदस्य राकेश दंडीकवार जनतेच्या हृदयात

29

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)
9404071883

चामोर्शी(दि.26सप्टेंबर):-राज्य सरकार द्वारे प्रथमच सन 2021-22 या वर्षाची खरीप हंगामाची ई पीक नोंदणी प्रयोग राबवण्यात येत आहे सदर ई पीक पाहणी ऐप स्मार्ट फोन द्वारे ऑनलाईन करावे लागते परंतु व सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी बांधवांना या बाबत कोणतेही माहिती नसल्याने तसेच अनेक शेतकरी बांधव यांच्याकडे स्मार्टफोन मोबाईल उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांची तारांबळ उडाली आहे. राज्य सरकारने सदर ई पीक नोंदणी करिता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत दिली आहे.

त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ई पीक पेरा नोंदनी करणे शक्य नाही करिता सदर ई पीक पाहणी चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत कोणसरी येथील ग्रामपंचायत सदस्य राकेश दंडीकवार यांनी ई पिक पाहणी अॅप विषयी निरक्षर शेतकऱ्यांना समजत नसल्याने स्वतः शेतकऱ्यांना बांधावर नेऊन ऑनलाईन पीक पेरा करून देत आहेत चामोर्शी तालुक्यात हे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अॅप या विषयी ऑनलाईन पीक पेरा करून देणारे पहिलेच ग्रामपंचायत सदस्य आहेत.

आपल्याला गावातील जनतेने निवडून दिले आहे व आपण निवडून येऊन खुर्ची पुरता मर्यादित न राहता आपण जनसेवा केलीच पाहिजे या हेतूने निरक्षर शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक पेरा न केल्यास भविष्यात नुकसान होऊ नये याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऑनलाईन पीक पेरा करून दिल्या जात असल्याची माहिती दिली
व पुढे बोलताना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांनी नुसता खुर्ची पुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऑनलाइन ही पिक पेरा करून निरक्षर शेतकऱ्यांना मदत करावी असे म्हटले