सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षचे बक्षीस वितरण व मार्गदर्शन सोहळा संपन्न

26

🔹उपेंद्र सावंत प्रथम,पल्लवी कवळे द्वितीय तर जोया मोगल तृतीय

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.27सप्टेंबर):-:- दिनांक 21 संप्टेबर रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण व मार्गदर्शन सोहळ्यात इंजिनीयर शिवाजी राजे पाटील बाभळीकर यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर वर मार्गदर्शन केले.छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा छत्रपती व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज बाबासाहेब राजे भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व दिनांक 21 सप्टेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्या परिक्षेचे पारितोषिक वितरण व मार्गदर्शन सोहळा काल कोहीनुर टाॅकीज मध्ये पार पडला.

या परिक्षेत चि.उपेंद्र कोडींबा सावंत ह्याचा प्रथम क्रमांक तर कु.पल्लवी अशोकराव कवळे हिचा दुसरा क्रमांक आला असुन तिसरा क्रमांक जोया मोगल हिचा आहे. संबंधित स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3111₹ रोख रक्कम संदीप पाटील कवळे यांच्यातर्फै तर द्वितीय पारितोषिक 2111₹ शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्याकडून होते तर तृतीय पारितोषिक 1111₹ सुधाकरदादा देशमुख धानोरकर यांच्यातर्फे देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक मा.श्री.मोहन भोसले सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पाटील कवळे,संगमेश्वर पाटील लांडगे, शिवानंद दादा देशमुख धानोरकर, गोविंद पाटील ढगे, अमोल पाटील ढगे,योगेश पाटील मोरे,धानोरा नगरीचे सरपंच ईरबा टोपे, अशोकराव पाटील कवळे आकाश सैदमवार आदी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष राजेश अविनाशराव पाटील मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन पाटील शिंदे यांनी केले.कार्यकमाच्या यशस्वितेसाठी कृष्णा पाटील कदम,विशाल पाटील जाधव,पवन पाटील ढगे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी अतिमोलाचे प्रयत्न केले.